दिवाळी शिधा वाटप कसं होतंय? घोषणा आणि रिअॅलिटी काय? पाहा ग्राऊंड रिपोर्ट…

| Updated on: Oct 22, 2022 | 4:33 PM

सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने शिधा वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला. त्याची ग्राऊंड रिअॅलिटी काय आहे? पाहुयात...

मुंबई : कोरोनानंतर दोन वर्षांनी दिवाळीचा (Diwali) सण उत्साहात साजरा होतोय. अशात सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने शिधा वाटपाचा (Anandacha Shidha) कार्यक्रम हाती घेतला. त्याअंतर्गत राज्याच्या काही भागात शिधा वाटप केलंही जातंय. पण काही ठिकाणी मात्र अद्याप हा शिधा पोहोचलेला नाही. त्यामुळे या सरकारी योजनेची ग्राऊंड रिअॅलिटी काय हे पाहणं गरजेचं होतं. त्यासाठी मनसेचे नेते-कार्यकर्ते मुंबईच्या विक्रोळी भागातील रेशन दुकानात पोहोचले. तिथं काय वास्तव समोर आलं? पाहुयात…

Published on: Oct 22, 2022 04:26 PM
मनसे, भाजप आणि शिंदे नव्या युतीसह पहा राज्यातील महत्वाच्या घडामोडी महाफास्ट न्यूज 100मध्ये
परतीच्या पावसाने कुठे काय झालं पहा नव्या अपडेट सुपरफास्ट 50 न्यूजमध्ये