Sindhusurg | श्री देव कुणकेश्वर मंदिरात महाशिवरात्री साजरी, मंदिर ड्रोन कॅमेऱ्याने टिपले
दक्षिण कोकणची काशी म्हणूनओळख असणाऱ्या सिंधुदुर्ग (Sindhudurga) जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वरच्या यात्रोत्सवाला आज मध्यरात्री बारा वाजल्यापासून सुरवात झाली.
दक्षिण कोकणची काशी म्हणूनओळख असणाऱ्या सिंधुदुर्ग (Sindhudurga) जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वरच्या यात्रोत्सवाला आज मध्यरात्री बारा वाजल्यापासून सुरवात झाली. मानाची तसेच शासकीय पूजा जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते करण्यात आली. 3 दिवस असणारा जत्रोत्सव यावर्षी दिडच दिवस असणार आहे. त्यानंतर मध्यरात्री माजी राज्यमंत्री व आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, युवा नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, सुशांत नाईक यांनी ही यथासांग पूजा करत आशीर्वाद घेतले. पहाटे पासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.कुणकेश्वर मंदिर आकर्षक फुलांनी व विद्युत रोषणाईने उजळून निघालं असून गाभाऱ्यात आंब्याची आरास ही करण्यात आली होती. जिल्ह्याबाहेरून ही रात्री पासूनच भाविक कुणकेश्वर मध्ये दाखल झाले आहेत.महाशिवरात्रीत दरवर्षी कुणकेश्वर मध्ये मोठया उत्साहात यात्रोत्सव होत असतो.गेल्यावर्षी कोरोनामुळे मर्यादित स्वरूपात यात्रोत्सव झाला.यंदा ही कोरोनाचे काही निर्बंध घालून हा यात्रोत्सव पार पडत आहे.