सुरूवात स्वतः पासून केली तर…; गुलाबराव पाटलांच्या आव्हानाला राष्ट्रवादी नेत्याचं जशाच तस उत्तर

| Updated on: Apr 21, 2023 | 7:52 AM

खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेवर टीका केली होती. त्यावरून गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना चौकटीत बोला अन्यता असा इसारा दिला होता

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण हे आरोपांमुळे चांगलेच चर्चेत आहे. त्यातच महाविकास आघाडीतील दोन नेत्यांमध्ये जोरदार जंपल्याने त्यात रंग भरला जात आहे. याचदरम्यान भाजप प्रवेशावरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार वाकसुद्ध पहायला मिळत आहे. याचदरम्या खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेवर टीका केली होती. त्यावरून गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना चौकटीत बोला अन्यता असा इसारा दिला होता. त्या इशाऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जे गुलाबराव पाटील राऊत यांना चौकटीत राहून बोलण्याचा सल्ला देत आहेत. ते चौकटीत राहून कधी बोलले असा सवाल खडसे यांनी केला आहे. तर ज्यांनी राऊत यांना चौकटीत राहून बोलण्याचा सल्ला दिला आहे, मुळात तो सल्लाच त्यांचा हास्यस्पद असल्याची टीकाही खडसे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर केली आहे.

Published on: Apr 21, 2023 07:52 AM
मराठा समाजाला आरक्षण याचिका फेटाळल्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आम्ही काम करत आहोत
खारघरवरुन वाद कायम, महाराष्ट्र भूषण सन्मानावेळी ‘हाजारो श्री सेवक पाण्याशिवाय तडफडून मेले’, कुणाचा दावा, बघा स्पेशल रिपोर्ट