”भाजपकडे माणसं धुवायची लाँड्री अन् पॉवडरही”; राष्ट्रवादी नेत्याचा भाजपवर हल्ला बोल
याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवरून राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. राज्यातील अनेत ठिकाणी यावरून आंदोलनं केली जात आहेत. तर भाजपवर टीकास्त्र सोडलं जात आहे.
मुंबई : राज्यात महाविकास आघाडीमधील लोकांना, त्रास दिला जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणाच्या मागून त्रास देण्यात येत आहे असा आरोप विरोधकांच्या कडून भाजप तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर करण्यात येत आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवरून राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. राज्यातील अनेत ठिकाणी यावरून आंदोलनं केली जात आहेत. तर भाजपवर टीकास्त्र सोडलं जात आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपवर टीका केली आहे. तसेच जयंत पाटील यांच्या चौकशीवरून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी जयंत पाटील यांनी काही चुकीचे केले नाही. त्यांच्यावर कारवाई होणार नाही. त्यामुळे कितीही वेळा त्यांची चौकशी केली तरी काहीही निष्पन्न होणार नाही असा टोला ईडीच्या मागून भाजपला लगावला आहे. तर भाजपचे नेतेच म्हणतात, त्यांच्याकडे माणसं धुवायची लाँड्री अन् पॉवडर आहे. ती गुजरातवरून येते. मग ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांना त्या लाँड्रीमध्ये टाकलं जात पावडर टाकली जाते आणि स्वच्छ केलं जात.