वॉटर ग्रीड योजना? मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची मुदतवाढ कोणी थांबवली? बावनकुळेंचा घणाघात
बावनकुळे यांनी, अजित पवार यांनी मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची मुदत वाढ थांबवताना काय म्हटलं होतं हे जरा विचारा. विधीमंडळातच त्यांनी आधी 12 आमदारांची मंजुरी द्या. मग महामंडळाची मंजुरी देतो असे म्हणाले होते
मुंबई : महाविकास आघाडीच्या छत्रपती संभाजीनगरमधील वज्रमूठ जाहीर सभेत भाजप आणि शिंदे-फडणवीस सरकारवर मविआच्या नेत्यांनी सडकून टीका केली. त्यानंतर त्या टीकेला भाजपसह शिंदे गटातील नेत्यांनी उत्तर दिलं. यादरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यावर निशाना साधत टीका केली आहे.
बावनकुळे यांनी, अजित पवार यांनी मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची मुदत वाढ थांबवताना काय म्हटलं होतं हे जरा विचारा. विधीमंडळातच त्यांनी आधी 12 आमदारांची मंजुरी द्या. मग महामंडळाची मंजुरी देतो असे म्हणाले होते. तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होताच त्यांनी तर मराठवाड्याची वॉटर ग्रीड योजनाच बंद केल्याचा आरोप केला. जो मराठवाडा पाण्याखाली येणार होता. तिच योजना बंद केली. तुम्ही तर मराठवाड्यासोबत बेईमानी केलीस असा घणाघात बावनकुळे यांनी केला आहे.