पूर्वी सारखी परिस्थिती नाही…,आता आम्ही…; अजित पवार याचं मोठं वक्तव्य; रोख कोनाकडे?

| Updated on: May 21, 2023 | 10:11 AM

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जागांवरून आपले दावे सांगितले आहेत. त्याचदरम्यान पटोले यांनी जागा वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेसला चिमटा काढला होता.

कोल्हापूर : महाविकास आघाडी (MVA) आगामी निवडणुका एकत्रित लढणार आहेत. पण जागावाटपाच्या मुद्द्यावरून अजुनही कोणतंही चित्र स्पष्ट झालेले नाही. याच्याआधीच मविआत आतापासूनच दावे प्रतिदावे केले जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जागांवरून आपले दावे सांगितले आहेत. त्याचदरम्यान पटोले यांनी जागा वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेसला चिमटा काढला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पटोलेंना प्रत्युत्तर देत त्यांचे कान टोचले आहेत. ते कोल्हापूर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) मजबूत ठेवण्याचे काम आपल्याला करायचे आहे. पण तुमची जास्त ताकद असेल तर महाविकास आघाडीमध्ये तुमचे महत्त्व कायम असेल. यापूर्वी काँग्रेसच्या जागा जास्त होत्या. त्यामुळे वाटाघाटी करताना राष्ट्रवादी काँग्रेसला लहान भावाची भूमिका घ्यावी लागत होती. आता मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा भाऊ आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता महाविकास आघाडीत ऐनवेळी गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

Published on: May 21, 2023 10:11 AM
नागपुरात अवैध रेती उत्खनन जोमात, महसूल विभाग कोमात; रेतीडेपोच्या नावाखाली अवैध रेती उत्खनन
2 हजाराची नोट बंद होणार, तुळशीबागेतल्या व्यापारांची काय परिस्थिती?