Jayant Patil On Shinde Fadnavis Govt | शिंदे सरकारच्या स्थापनेसाठी काही देवाण-घेवाण झालेली दिसतेय

| Updated on: Aug 28, 2022 | 12:01 PM

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारसह शिंदे गट आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी जयंत पाटील यांनी शिंदे सरकारच्या स्थापनेसाठी काही देवाण-घेवाण झालेली दिसलेली दिसते असं म्हटलेलं आहे.

महाविकास आघाडीला धक्का देत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आले. त्यानंतर पहिले अधिवेशन देखिल पार पडले आहे. तर सत्ता संघर्षाचा प्रश्न न्यायालयात गेला आहे. यादरम्यान विरोधक आणि सत्ताधारी हे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारसह शिंदे गट आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी जयंत पाटील यांनी शिंदे सरकारच्या स्थापनेसाठी काही देवाण-घेवाण झालेली दिसलेली दिसते असं म्हटलेलं आहे. तर जेथे नेते शिंदे गटात गेले तेथे मात्र कार्यकर्ते हे पक्षाशी एकनिष्ठ राहिले. काही ठिकाणी आमदार हा प्रभावी असेल तिथे 40 ते 50 टक्के कार्यकर्ते त्यांच्याबरोबर गेल्याचे देखिल पाटील यांनी म्हटलेलं आहे. तर हे सरकार कोणत्या मार्गाने स्थापन झाले हे या बैलपोळ्याच्या निमित्ताने जनतेसमोर आलं आहे. हे सरकार देवाण-घेवाणीतून आलेलं आहे. तर त्या देवाण-घेवाणीचा आकडा हा 50 खोक्यांपर्यंत गेल्याचं बैलच सांगत आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे.

Published on: Aug 28, 2022 12:01 PM
Sandeep Deshpande | Aaditya Thackeray यांच्या मतदारसंघात मनसेची सदस्य नोंदणी जनजागृती प्रभातफेरी
‘ठाकरेंसोबतचे आणखी 2 आमदार फुटणार’; मंत्री संदिपान भुमरेंचा दावा