ठरलं! अखेर अजित पवार यांना मिळणार ‘या’ खात्याची जबाबदारी; मात्र शिंदे गटाची धाकधूक वाढली?
तीन एक वर्षानंतर अजित पवार यांची विरोधी पक्ष नेत्याच्या खुर्चीवर जाऊन उपमुख्यमंत्री पदावर शपथविधी झाला आहे. त्यानंतर त्यांना अर्थ खातं दिलं जाऊ नये अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली होती.
मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार पडण्याचे कारण अजित पवार ठरले होते. तर त्याच्यांकडे असणारे अर्थ मंत्रालय याला जबाबदार होते असे शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या आरोपांवरून मागे दिसून आलं होतं. त्यानंतर तीन एक वर्षानंतर अजित पवार यांची विरोधी पक्ष नेत्याच्या खुर्चीवर जाऊन उपमुख्यमंत्री पदावर शपथविधी झाला आहे. त्यानंतर त्यांना अर्थ खातं दिलं जाऊ नये अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली होती. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर मोठा तिडा निर्माण झाला होता. जो आत्ता सुटल्याचे सुत्रांकडून कळत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार अजित पवार यांना अर्थ मंत्रालयाची जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यामुळे आता शिंदे गटात नाराजीचा सुर आवळला जातो का हे पहावं लागणार आहे.
Published on: Jul 05, 2023 10:59 AM