महाविकास आघडी सरकारने ओबीसी समाजाचा घात केला – चंद्रशेखर बावनकुळे

| Updated on: May 04, 2022 | 4:58 PM

यापुढे ओबीसी जनता महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना गावात फिरून देणारा नाही. ओबीसी समाज या सगळयाचा बदला घेतल्या शिवाय राहणार नाही . असा इशारा भाजप (BJP) नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

नागपूर – महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas aghadi  government) पुन्हा ओबीसी समाजाचा घात केला आहे . सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यात निवडणूक(election) जाहीर करण्यास सांगितले आहे. गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने वेळखाऊपणा केला. सरकर ट्रीपला स्टेजपूर्ण करत नाही. त्यामुळं आज न्यायालयाने हा निकाल दिला आहे. यामुळे ओबीसीवर मोठा अन्याय झाला आहे . यापुढे ओबीसी जनता महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना गावात फिरून देणारा नाही. ओबीसी समाज या सगळयाचा बदला घेतल्या शिवाय राहणार नाही . असा इशारा भाजप (BJP) नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर माध्यमासोबत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

Published on: May 04, 2022 04:58 PM
अखेर राणा दाम्पत्याला जामीन मिळाला ; मुंबईसत्र न्यायालयाचा राणा दांपत्याला दिलासा ;
मुख्यमंत्री उद्धवजी व माझी पत्नी अमृतामध्ये एक साम्य आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी दिले उत्तर