कोकणातील तीन विधानसभा जागांवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु
विधानसभा निवडणूकाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील सावंतवाडी, राजापूर आणि चिपळूण या तीन जागांसाठी महाविकास आघाडीत अनेक इच्छुक असल्याने त्यांच्या रस्सीखेच सुरु आहे. या तीन जागांवर घटक पक्षातील तिघांनी देखील दावे केले आहेत. त्यामुळे या जागा कोणाच्या वाट्याला जातात याकडे लक्ष लागले आहे.
कोकणातल्या महाविकास आघाडीत रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन जागांवर महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु आहे. सावंतवाडी, राजापूर आणि चिपळूण यासाठी ही रस्सीखेच सुरु आहे.सावंतवाडी विधानसभा जागेवर शरद पवार राष्ट्रवादी गटाने दावा केला आहे. तर राजापूरसाठी कॉंग्रेस गट आग्रही असल्याचे दिसत आहे. सावंतवाडी, राजापूर आणि चिपळूण ठाकरे गटाची हक्काचे मतदार संघ आहेत. तर दुसरीकडे या जागा सोडवून घेऊ असे आश्वासन राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक नेत्यांना दिले आहे. अजित गटाचे चिपळूणचे आमदार असलेल्या जागेसाठी ठाकरे गट आग्रही असल्याचे म्हटले जात आहे.चिपळूण मतदार संघातून ठाकरे गटाचे भास्कर जाधव आग्रही असल्याचे सांगितले जात आहे. चिपळूण जागेवर शरद पवार गटाचे प्रशांत यादव आणि ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांच्या रस्सीखेच सुरु आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील तीन जागांचा पेच अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे या तीन जागा महाविकास आघाडीत कोणाच्या वाट्याला जाणार याची उत्सुकता लागली आहे.