मुख्य पोडिअम न देणं हा राऊतांचा निर्णय; अजितदादांचा अपमान केला; नितेश राणेंची टीका
असेच घाणेरडं राजकारण संजय राऊतांनी आधी बाळासाहेबांपासून ते पवारसाहेबांपर्यंत केलं आणि अजित पवार यांच्याबरोबर करत आहे.
मुंबई : महाविकास आघाडीची मुंबईच्या बीकेसीतील वज्रमुठ सभा महाराष्ट्र दिनी पार पडली. यावेळी मविआचे नेते उपस्थित होते. यावेळी स्टेजवर पोडिअमचा वाद झाला. या पोडिअमवरून खासदार संजय राऊत यांच्यावर आमदार नितेश राणेंनी टीका केली आहे. त्यांनी मुख्य पोडिअम न देणं हा निर्णयही संजय राऊतांनी घेतला असा गौप्यस्फोट केला. तसेच असेच घाणेरडं राजकारण संजय राऊतांनी आधी बाळासाहेबांपासून ते पवारसाहेबांपर्यंत केलं आणि अजित पवार यांच्याबरोबर करत आहे. अजित पवार यांचा अपमान करायचा राऊत यांनी प्रयत्न केला. यावेळी राऊत यांनी आधी अजित दादा स्टेजवर आले असताना न बघीतल्या सारखे केलं. भेटताना ताटपणा दाखवला आणि भाषणात गोडवे गायले. शकुनी मामालाही लाज वाटेल, की हा माझ्यापेक्षा जास्त कपटी आहे. शकुनी मामा बरा होता, असं बोलण्याची वेळ आलेली आहे”, अशा शब्दांत नितेश राणेंनी संजय राऊतांवर टीका केली.