अजित पवार यांच्या सुचकं वक्तव्यानंतर काँग्रेस नेत्यानं सुनावलं; म्हणाला, कोणी गर्व करावा….

| Updated on: May 21, 2023 | 10:28 AM

याच्याआधीच मविआत आतापासूनच दावे प्रतिदावे केले जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जागावाटपावरून काही सुचक वक्तव्य केलं होतं. त्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कान टोचले होते.

मुंबई : महाविकास आघाडी (MVA) आगामी निवडणुका एकत्रित लढणार आहेत. पण जागावाटपाच्या मुद्द्यावरून अजुनही कोणतंही चित्र स्पष्ट झालेले नाही. याच्याआधीच मविआत आतापासूनच दावे प्रतिदावे केले जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जागावाटपावरून काही सुचक वक्तव्य केलं होतं. त्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कान टोचले होते. तसेच आता आम्हीच आघाडीत मोठे भाऊ असल्याचे सांगितलं होतं. त्यावरून आता पटोले यांनी पलवार केला आहे. त्यांनी, आम्ही कधीच लहान मोठा भाऊ असं केलं नाही. ती आमची परंपरा नाही. आम्ही सगळ्यांनाच सोबत घेऊन चालतो. त्यामुळे कोणी गर्व करावा हा त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे या वक्तव्यावरून काही बोलावं असं वाटतं नाही असे ते म्हणालेत.

Published on: May 21, 2023 10:28 AM
पूर्वी सारखी परिस्थिती नाही…,आता आम्ही…; अजित पवार याचं मोठं वक्तव्य; रोख कोनाकडे?
2 हजाराची नोट बंद होणार, तुळशीबागेतल्या व्यापारांची काय परिस्थिती?