महाविकास आघाडीनं राज्यात प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न केले, अजित पवार यांचे स्पष्टीकरण

| Updated on: Sep 14, 2022 | 7:26 PM

एक हजार एकर जमीन त्यांना पाहिजे होते. त्यातून दोन लाख लोकांना काम उपलब्ध होणार होतं. त्यावेळी वेदांतानं पुण्यातील तळेगावची जागा फायनल केली होती. परंतु, आता राजकीय दबावापोटी ही गुंतवणूक गुजरातला नेल्याचं कळतं, असं अजित पवार यांनी म्हंटलं.

महाविकास आघाडी सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करत होते. वेगवेगळे प्रकल्प महाराष्ट्रात यावे, यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत होते. कोरोनानंतर चीनमधून काही प्रकल्प दुसऱ्या देशात जाण्याचा विचार करतात, अशी माहिती मिळाली होती. त्याचा राज्याला फायदा व्हावा, यासाठी प्रयत्न करण्यात आले. उद्योगमंत्री सुभाष देसाई होते. वेदांता प्रकल्प दुसरीकडं जायचा विचार करत होता. तिथं दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होती. एक हजार एकर जमीन त्यांना पाहिजे होते. त्यातून दोन लाख लोकांना काम उपलब्ध होणार होतं. त्यावेळी वेदांतानं पुण्यातील तळेगावची जागा फायनल केली होती. परंतु, आता राजकीय दबावापोटी ही गुंतवणूक गुजरातला नेल्याचं कळतं, असं अजित पवार यांनी म्हंटलं.

Published on: Sep 14, 2022 07:26 PM
सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवारांना मुख्यमंत्रीपद द्या
Sudhir Mungantiwar : वेदांता, फॉक्सकॉनवरून सुधीर मुनगंटीवार यांचा काँग्रेसला टोला, ये अंदर की बात हैं क्या?