शिंदेंसह भाजपने धास्ती घेतली, त्यातूनच नागपूरच्या सभेला विरोध; देशमुखांची सडकून टीका

| Updated on: Apr 13, 2023 | 9:37 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शिंदे गट आणि भाजपवर निशाना साधला आहे. संभाजीनर येथे वज्रमूठ सभेला मिळालेल्या प्रतिसादामुळे विरोधक हे धास्तावलेत असा घणाघात त्यांनी केली आहे

वर्धा : 16 एप्रिल रोजी महविकास आघाडीतर्फे नागपूर येथे वज्रमूठ सभा होणार आहे. त्याला भाजपसह स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. फक्त विरोधच केला नाही तर आंदोलन देखिल केलं आहे. त्यामुळे येथे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शिंदे गट आणि भाजपवर निशाना साधला आहे. संभाजीनर येथे वज्रमूठ सभेला मिळालेल्या प्रतिसादामुळे विरोधक हे धास्तावलेत असा घणाघात त्यांनी केली आहे. यासभेला यावेळी काँगेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या तिन्ही पक्षाचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असेही ते म्हणाले. तर मविआतील प्रत्येक पक्षाला दोन सभांचे नियोजन दिल्याचे त्यांनी सांगितलं.

Published on: Apr 13, 2023 09:37 AM
Anil Deshmukh : पंचनाम्यांचे अहवालानंतर तातडीनं मदत द्या; नाही तर… ; माजी गृहमंत्र्यांचा सरकारला डोस
वाशिममध्ये आज भाजपचा संकल्प मेळावा, देवेंद्र फडणवीस-चंद्रशेखर बावनकुळे संबोधित करणार