मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
अभिनेता गोविंदा याने भाजपाचे नेते राम नाईक यांना मागे हरविले होते. त्यावेळी राम नाईक यांनी गोंविदावर जिंकण्यासाठी अंडरवर्ल्डची मदत घेतल्याचा आरोप केला होता. असा उमेदवार सहकारी पक्ष म्हणून भाजपाला चालेल का ? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
मुंबई : महाविकास आघाडी राज्यातील लोकसभेच्या 48 जागा लढविणार आणि आम्हाला या जागा जिंकण्याचा आत्मविश्वास असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. जागा वाटपा संदर्भात वंचितला पाच जागांचा प्रस्ताव दिल्याचा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला आहे. वंचितने पुन्हा विचार करुन महाविकास आघाडीत यावे असेही ते म्हणाले. मविआच्या जागा वाटपा संदर्भात कोणतीही चर्चा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक किंवा उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी झालेली नाही. या बैठका इतर ठिकाणी झाल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. अभिनेता गोंविदा यांनी भाजपाचे नेते राम नाईक यांना मागे निवडणूकीत हरविले होते. राम नाईक यांचे त्यावेळचे एक स्टेटमेंट आपण आताच वाचले, त्यात त्यांनी गोंविदाने निवडणूक जिंकण्यासाठी अंडरवर्ल्डची मदत घेतल्याचा आरोप केला होता. त्यामुळे अशा त्यांच्या सहकारी पक्षाचा असा उमेदवार भाजपाला चालेल का ? किंवा राम नाईक खोटे बोलत आहेत का? यावर भाजपाने उत्तर द्यावे अशी मागणी संजय राऊत यांनी यावेळी केली.