महाविकास आघाडीला 35-36 पेक्षा जादा जागा मिळतील, एकनाथ खडसे यांचा दावा
साऱ्या सत्ताधारीपक्षांच्या विरोधक म्हणूनच मी एकटाच दिसत आहे. नाथा भाऊंना व्यक्तीगत विरोध करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, कापसाचा , सोयाबीन, तूर कमी भावात घेतली जात आहे. शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न आहे त्याकडे लक्ष पुरवावे असे आवाहन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
जळगाव | 31 डिसेंबर 2023 : येणारे वर्षे लोकसभा निवडणूका आणि विधानसभा निवडणूकांचे वर्षे आहे. सध्या महायुतीने 45 जागा निवडून येतील असा दावा केला आहे. यावर एकनाथ खडसे यांना विचारले असता खडसे यांनी त्यांनी 48 जागा निवडून येणार असे का सांगितले नाही ? 3 जागा तरी कोणाला सोडल्या असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला आहे. रावेर लोकसभेची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाला मिळावी अशी आपण मागणी केल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपण ही जागा लढविण्यासाठी उत्सुक असून जर तब्येत साथ देत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपण योग्य तो पुढचा निर्णय घेऊ असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. सर्वेमध्ये महाविकास आघाडीला जादा जागा मिळतील असा सर्वेचा अंदाज आहे. मात्र त्यापेक्षा अधिक जागा मिळतील असे एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे.
Published on: Dec 31, 2023 02:35 PM