Vidhan Parishad elections : विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय निश्चित – नाना पटोले

| Updated on: Jun 19, 2022 | 10:39 AM

विधान परिषद निवडणूक महाविकास आघाडीचेच उमेदवार जिंकणार, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीमधील घटक पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक आहे. या बैठकीपूर्वी विधान परिषदेची निवडणूक महाविकास आघाडीच जिंकणार असल्याचा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. मात्र दुसरीकडे शिवसेना आमदार विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मतदान करणार नसल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेला मदत न करणाऱ्या पक्षाला मतदान का करायचे असा सवाल या आमदारांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

 

 

Published on: Jun 19, 2022 09:58 AM
विधान परिषद निवडणूक: शिवसेना आमदारांचा काँग्रेस, राष्ट्रवादीला मतदान करण्यास विरोध
Vidhan Parishad elections : काँग्रेस, राष्ट्रवादीला मतदान करणार नाही; संजय पवार, बाजोरियांच्या पराभवामुळे शिवसेना आमदार आक्रमक