पाकिस्तानमध्ये घुसून गोळ्या घालण्याची ताकद फक्त दाढीवाल्यांमध्येच; भाजप नेत्याचं वक्तव्य

| Updated on: Jan 30, 2023 | 10:44 AM

भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्टाईलचं कौतुक केलंय. पाहा काय म्हणालेत...

भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्टाईलचं कौतुक केलंय. पाकिस्तानमध्ये घुसून गोळ्या घालण्याची ताकद फक्त दाढीवाल्यांमध्येच आहे, अशा शब्दात लांडगे यांनी सर्जिकल स्ट्राईकचं कौतुक केलंय. महाराष्ट्रावर कितीही मोठं संकट आलं तरी त्याच्यावर मात करण्याची ताकद असणारं सरकार सध्या सत्तेत आहे, असंही लांडगे म्हणालेत. एकनाथ शिंदेंच्या मनात मी होतो. कारण मी दाढीवाला आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

Published on: Jan 30, 2023 10:43 AM
आचारसंहितेचा भंग, रणजित पाटील यांच्यावर अदखलपात्र गुन्हा
भाजप नेत्यांनी नरेंद्र मोदी यांच्याच विरोधात मोर्चा काढला का?; संजय राऊतांचा सवाल