नाही मन… काय करील तिळगुळ, मकर संक्रातीच्या विरोधकांना अनोख्या शुभेच्छा

| Updated on: Jan 15, 2023 | 4:35 PM

विरोधकांना शुभेच्छा देण्यात काही वाईट नाही. कारण, शिवसेनाप्रमुख मस्त म्हणायचे, शत्रू नाही तो माणूस नाही.

मुंबई : मकर संक्रातीच्या ( Makar Sankrat ) शुभेच्छा राज्यातील जनतेला आहेत. विरोधकांना आहेत. पण, ज्यांनी कृतघ्नपणा केला अशा माणसांना शुभेच्छा द्यायच्या? ज्यांना राज्याचा अभिमान नाही, मराठी माणसाचा अभिमान नाही अशा पाठीत सुरा खुपसणाऱ्यांना शुभेच्छा द्यायच्या, असा सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार अरविंद सावंत ( Arvind Sawant ) यांनी केला.

राज्यात महिलांवरील अत्याचार वादळे आहेत त्याकडे लक्ष नाही आणि आम्ही उर्फी तुर्फीमध्ये अडकलो आहोत. राज्यातले उद्योग बाहेर गेले. बरोजगारांचा रोजगार गेला. त्यावर कुणी काही बोलत नाही अशी टीका त्यांनी केली.

महाराष्ट्रात ज्या कारवाया सुरु आहेत त्या कोणावर तर मराठी माणसावर सुरु आहेत. तिकडच्या आमदारांना रोज मंत्रीपदाची स्वप्ने पडताहेत. उद्या सकाळी माझे नाव आहे का याच तंद्रीत ते आहेत. म्हणून तर ते गाडयांना उडवतात, अशा टोलाही त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांना लगावला.

Published on: Jan 15, 2023 04:35 PM
चित्रा वाघ यांनी मारण्याची धमकी दिली, उर्फी जावेदची राज्य महिला आयोगाकडे तक्रार; म्हणाली…
रात्रीचे प्रेम वाढवा, निवडणूक जिंकण्यासाठी चंद्रकांत पाटील यांचा अनोखा सल्ला