अनेक घरं उध्वस्त मात्र…; आप्पा पाडा परिसराताल नागरिकांचे ठिय्या आंदोलन

| Updated on: Mar 16, 2023 | 7:46 AM

मालाड पूर्वमधील झोपडपट्टीला लागलेल्या भीषण आगीनंतर मालाडमधील आप्पा पाडा परिसरात नागरिक मुख्यमंत्रीच्या भेटीला वर्षावर गेले.

मुंबई : मालाड पूर्वमधील झोपडपट्टीला लागलेल्या भीषण आगीत शेकडो झोपड्या जळून खाक झाल्या अनेक घर उध्वस्त झाली. मात्र त्यांना भेटण्यासाठी कोणतीही शासकीय यंत्रणा गेली नाही की कुठली मदत पोहचली नाही. त्यामुळे येथील नागरीक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षावर पोहचले. मात्र मुख्यमंत्री शिंदेच तेथे नसल्याने नागरीकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटल्याशिवाय जाणार नाही अशी भूमिका घेतली. दरम्यान पोलीसांनी मध्यस्थी केल्याने नागरीकांनी ठिय्या सोडला. पण आमचा हक्क जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करू अशी भूमिकाही आप्पा पाडा परिसराताल नागरिकांनी घेतली आहे.

Published on: Mar 16, 2023 07:46 AM
सगळ्या मागण्या मान्य होतीलच असं नाही, पण…; शेतकरी आंदोलनासंदर्भात मंत्री दादा भुसे यांचं वक्तव्य
शितल म्हात्रेंसाठी आक्रमक भूमिका घेता मग गौतमी पाटीलसाठी का नाही?; ठाकरे गटाच्या नेत्याचा सवाल