मंदिरही सुरक्षीत नाहीत! मालेगावातील व्याघ्रंबरी देवी पाठोपाठ आता ‘या मंदिरात’ चोरट्यांनी केला हाथ साफ
त्यानंतर कॅम्प पोलिसांनी तपास करत तिघा भामट्यांना अटक केली होती. त्यानंतर आता नाशिकच्याच एका वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या मंदिरात घुसून चोरी करण्यात आल्याचे समोर आले आहे.
नाशिक : काही दिवसांपुर्वी मालेगाव येथील कॅम्प भागातील व्याघ्रंबरी देवीच्या मंदिरात चोरी झाली होती. त्यावेळी तेथील दानपेटी व चांदीच्या चरण पादुका असा सुमारे 20 हजारांच्या मुद्देमालाची चोरी करण्यात आली होती. त्यानंतर कॅम्प पोलिसांनी तपास करत तिघा भामट्यांना अटक केली होती. त्यानंतर आता नाशिकच्याच एका वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या मंदिरात घुसून चोरी करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही चोरी गणेशवाडीच्या पंचवटीत देवी मंदिरात करण्यात आली असून देवीच्या चांदीच्या पादुकांवर चोरांनी हाथ साफ केला आहे. ही चोरी रात्रीच्या सुमारास करण्यात आला असून घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. याबाबत पंचवटी पोलीसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
Published on: May 29, 2023 02:00 PM