मराठी पाट्या लावण्यावरून मालेगावात मनसे आक्रमक
मराठी पाट्या लावण्याबाबत एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. तर एका महिन्यानंतर जर निवेदनाची अंमलबजावणी झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या स्टाईलने रस्त्यावर उतरेल असेही सांगण्यात आलं आहे
मालेगाव : मालेगाव महानगरपालिका हद्दीतील दुकानावरील तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवरील इंग्रजी पाट्यांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता आक्रमक झाली आहे. यावेळी मनसेकडून मराठी पाट्या लावण्याबाबत महापालिकेला निवेदन देण्यात आलं आहे. तर मराठी पाट्या लावण्याबाबत एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. तर एका महिन्यानंतर जर निवेदनाची अंमलबजावणी झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या स्टाईलने रस्त्यावर उतरेल असेही सांगण्यात आलं आहे. तर महाराष्ट्रात राहून किमान मराठीप्रती आदरभाव दाखविला जात नाही याबद्दल खंत व्यक्त करीत दुकानांवरील पाट्या मराठीतच करा असेही मनसेकडून आवाहन करण्यात आले आहे.