त्यांना नैतिक अधिकार नाही; भाजप नेत्याची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

| Updated on: Mar 27, 2023 | 7:27 AM

निवडणुकांच्या टीकेवर पडळकर यांनी बोलताना, घोडमैदान लांब नाही कशाला काही गडबड करता असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे

इंदापूर : मालेगाव येथे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर सडकून टीका केली. ठाकरे यांनी भाजप म्हणजे भ्रष्ट जनता पार्टी असा थेट आरोप करत टीका केली होती. त्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पलटवार केला आहे. तसेच त्यांना भारतीय जनता पार्टीच्या बाबतीमध्ये बोलण्याचा कुठलाच नैतिक अधिकार नाही असेही ते म्हणाले.

यावेळी पडळकर यांनी, गेल्या अडीच वर्षांमध्ये झालेले सगळे घोटाळे हे ठाकरे मुख्यमंत्री असताना झाले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या बाबतीमध्ये असं स्टेटमेंट करणं म्हणजे त्यांनी स्वतः आपण काय बोलतोय याचा सारासार विचार करून बोलायला पाहिजे असा टोला लगावला आहे.

तर निवडणुकांच्या टीकेवर पडळकर यांनी बोलताना, घोडमैदान लांब नाही कशाला काही गडबड करता असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. एक वर्षानंतर तुम्हाला लोकसभेला आणि त्यानंतर विधानसभेला सामोरे जावं लागणार आहे मग होईल दुध का दुध आणि पाणी का पाणी असं ही ते म्हणाले.

Published on: Mar 27, 2023 07:27 AM
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साईंच्या दरबारी, घेतले साईबाबांच्या समाधीचे दर्शन
जगात काहीही चोरलं जाऊ शकतं, पण ‘या’ दोन गोष्टींची चोरी होऊच शकत नाही!; शिवसेनेच्या नेत्याचा ठाकरेंवर हल्लाबोल