मामाजी ऊर्फ शिवराज सिंह चौहान यांनी प्रथमच घेतली केंद्रिय मंत्रिपदाची शपथ

| Updated on: Jun 09, 2024 | 9:54 PM

आपल्या 'मुख्यमंत्री लाडली बहना' या योजनेद्वार भाजपाला विजय मिळून देणारे मध्यप्रदेशचे पाचवे मुख्यमंत्री होता.. होता.. राहीलेल्या मध्य प्रदेशचे लाडके मामाजी ऊर्फ शिवराज सिंह चौहान यांनी प्रथमच केंद्रिय मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Follow us on

शिवराज सिंह चौहान यांनी आज केंद्रिय मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शिवराज सिंह चौहान मध्य प्रदेशातील विदीशा मतदार संघातून तब्बल आठ लाख मताधिक्याने विजयी होणारे एकमेव खासदार आहेत. ते चार वेळा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या ‘मुख्यमंत्री लाडली बहना’ या योजनेने मध्य प्रदेशात भाजपाला विधानसभेत मोठा विजय मिळाला. त्यांना प्रेमाने मामा म्हटले जाते. त्यांना मध्य प्रदेशात मुख्यमंत्री पदाचे बक्षिस न देता भाजपाने खासदारकीला उभे केले होते. त्यांना आठ लाखांचे मताधिक्य मिळाले आहे. त्यांचे नाव शपथविधीला घेतले तेव्हा राष्ट्रपती भवनातील प्रांगणात एकच जयघोष झाला आणि टाळ्यांचा गजर झाला. त्यांनी प्रथमच केंद्रिय मंत्री पदाची शपथ घेतली आहे.