विमान प्रवासादरम्यान मास्क बंधनकारक
विमान प्रवासादरम्यान मास्क वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे. जे प्रवासी मास्क वापरणार नाहीत त्यांना खाली उतरवा, अशा सूचना डीजीसीएच्या वतीने विमान व्यवस्थापनाला देण्यात आल्या आहेत.
देशात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. कोरोना रुग्ण वाढत असल्याने चौथ्या लाटेची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता सरकारकडून खबरदारी घेण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर विमान प्रवासादरम्यान मास्क वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे. जे प्रवासी मास्क वापरणार नाहीत त्यांना खाली उतरवा, अशा सूचना डीजीसीएच्या वतीने विमान व्यवस्थापनाला देण्यात आल्या आहेत.