Video : नवनीत राणा यांची विचारपूस करण्यासाठी मंगल प्रभात लोढा लिलावती रुग्णालयात

| Updated on: May 06, 2022 | 5:21 PM

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर हनुमान चालिसा लावण्याचं आव्हान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा यांनी दिलं. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागलं. शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यासह त्यांच्यावर राजद्रोहाचाही गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर राणा दाम्पत्याला 12 दिवस जेलवारी करावी लागली. अखेर जामिनावर […]

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर हनुमान चालिसा लावण्याचं आव्हान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा यांनी दिलं. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागलं. शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यासह त्यांच्यावर राजद्रोहाचाही गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर राणा दाम्पत्याला 12 दिवस जेलवारी करावी लागली. अखेर जामिनावर सुटका झाल्यानंतर हे दोघेही बाहेर आले. मात्र, नवनीत राणा यांना मानेच्या त्रासामुळे थेट लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं.  त्यांची विचारपूस करण्यासाठी भाजप नेते मंगल प्रभात लोढा लिलावती रूग्णालयात पोहोचले. त्यांनी नवनीत राणा यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

Published on: May 06, 2022 05:20 PM
Raosaheb Danve: शरद पवारांच्या सुरात दानवेंचा सूर, काय म्हणाले रावसाहेब दानवे?
Video : अमित ठाकरेंच्या लेकाचं बारसं, किआन नावाचा अर्थ काय?