UPSC Exam : आई-वडिलांच्या कष्टाचं चीज; छोट्या गावच्या मंगेश खिलारीने मिळवले घवघवीत यश
टॉपर होण्याची संधी मिळाली नसली तरी ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांमध्ये सामान्य कुटुंबातील अनेक उमेदवार आहेत. ज्यांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर हे यश संपादीत करत आई-वडिलांच्या कष्टाचं चीज केलं आहे.
अहमदनगर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. त्यामध्ये टॉपर होण्याची संधी मिळाली नसली तरी ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांमध्ये सामान्य कुटुंबातील अनेक उमेदवार आहेत. ज्यांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर हे यश संपादीत करत आई-वडिलांच्या कष्टाचं चीज केलं आहे. नगरच्या संगमनेर तालुक्यातील सुकेवाडीचा मंगेश खिलारी याने आई-वडीलांच्या मेहनतीली आज सफल केलं आहे. त्याने युपीएससी परिक्षेत देशात 396 वी रँक मिळविली आहे. वडील गावात चहाची टपरी चालवितात, तर आई विडी कामगार आहे. वडिलांना युपीएससीबद्दल ऐकून तरी माहिती आहे, आईला तर यातील काहीच कळत नाही. मात्र त्यांच्या या कष्टामुळेच आपण या यशाला गवसनी घातल्याचे मंगेश खिलारी याने म्हटलं आहे.
Published on: May 24, 2023 07:55 AM