मोदी, शाह यांच्यावरील टीकेला भाजपचं प्रत्युत्तर, राऊत हा लँड माफिया कोणी केली टीका
यावेळी राऊत म्हणाले, पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री शाह हे कर्नाटकात ठाण होते. पण आता तुमच्या हातून कर्नाटकही जाणार आणि मणिपूरही. कर्नाटक निवडणुकीकरता पैशांचा महापूर आला. अगदी बजरंग बलीला निवडणुकीत उतरवलं.
मुंबई : मणिपूरमध्ये हिंसाचार (Manipur violence) उफाळला आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होते. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) टीका केली आहे. यावेळी राऊत म्हणाले, पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री शाह हे कर्नाटकात ठाण होते. पण आता तुमच्या हातून कर्नाटकही जाणार आणि मणिपूरही. कर्नाटक निवडणुकीकरता पैशांचा महापूर आला. अगदी बजरंग बलीला निवडणुकीत उतरवलं. हनुमान चालिसा, वगैरे वगैरे. पण मी तुम्हाला सांगतो, यांना कोणताही देव पावणार नाही. बजरंग बलीच त्यांना गदाने मारणार, असं राऊत म्हणाले. यावर भाजपने पलटवार केला आहे. तर भाजप नेते नितेश राणे यांनी राऊत यांचा समाचार घेत टीका केली. तसेच राऊत हा सर्वा मोठा लँड माफिया आहे. तर उद्धव ठाकरे सातत्याने दंगली भडकवण्याचा आरोप करतायेत. दंगलीचा फायदा घेऊन मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न त्यांचे होते असा मोठा दावा नितेश राणेंनी केला आहे. त्यांची गृहविभागे चौकशी करायला हवी असेही त्यांनी म्हटलं आहे.