मोठी बातमी ! मनिषा कायंदेंचा ठाकरे गटाला धक्का, 3 माजी नगरसेवकांसह करणार शिवसेनेत प्रवेश
शिवसेना पक्षाचा उद्या वर्धापन दिन आहे. त्याआधी ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. काल शिशिर शिंदे यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता ठाकरे गटाचा आणखी एक आमदार शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणार आहे.
मुंबई : शिवसेना पक्षाचा उद्या वर्धापन दिन आहे. त्याआधी ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. काल शिशिर शिंदे यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता ठाकरे गटाचा आणखी एक आमदार शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणार आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या अशी ओळख असलेल्या आमदार मनिषा कायंदे या आज रात्री शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मनिषा कायंदे यांच्यासह तीन माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मनिषा कायंदे या मागच्या काही दिवसांपासून ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा होती. मनिषा कायंदे या नॉट रिचेबल आहेत. त्यांचा फोन बंद आहे. शिवाय त्यांच्याशी संपर्क होत नाहीये.