सुषमा अंधारे यांच्या ‘त्या’ पत्रावर मनीषा कायंदे म्हणतात, “त्या बाईसारखे आम्ही मीडिया सेव्ही नाही…”
विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे.पक्ष सोडतांना त्यांनी ठाकरे गटातील उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर अनेक आरोप केले. याच पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी खासदार राहुल शेवाळे यांनी लिहिलेल्या पत्रामुळे मनीषा कायंदे घाबरल्या होत्या, त्यामुळे त्यांनी तिकडे प्रवेश केला, असं म्हटलं आहे. सुषमा अंधारे यांच्या या विधानावर आता मनीषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला. शिवसेनेत बंड झाल्यापासून वर्षभर कायंदे यांनी ठाकरे गटाची बाजू आक्रमकते मांडली. मात्र अवघ्या वर्षभरातच त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. पक्ष सोडतांना त्यांनी ठाकरे गटातील उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर अनेक आरोप केले. याच पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी खासदार राहुल शेवाळे यांनी लिहिलेल्या पत्रामुळे मनीषा कायंदे घाबरल्या होत्या, त्यामुळे त्यांनी तिकडे प्रवेश केला, असं म्हटलं आहे. सुषमा अंधारे यांच्या या विधानावर आता मनीषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “असं असतं तर मी एका महिन्यापूर्वीच गेले असते. आदित्य ठाकरे यांच्यासाठी मी ढाल म्हणून उभी राहिले होते. सभागृहात मी त्यांच्यासाठी बोलले. म्हणून मी राहुल शेवाळे यांच्याविरोधात SIT ची मागणी केली. सुषमा अंधारे यांच्यासोबत मी सहा महिने बोलले नाही. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील महिला आघाडी अस्वस्थ आहे. जायचे असेल तर एका वर्षांपूर्वीच गेले असते. त्या बाईसारखे आम्ही काही मीडिया सेव्ही नाही,” असं कायंदे म्हणाल्या.