Special Report : मनीषा कायंदे यांना अडचणीत आणणारी ‘ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल; नेमकं प्रकरण काय?

| Updated on: Jun 26, 2023 | 8:33 AM

शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांची सध्या एक ऑडिओ क्लिप चर्चेचा विषय बनली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये मनीषा कायंदे यांच्या स्वीय सहाय्यकाने निधीच्या मोबदल्यामध्ये 10% कमिशन मागितल्याचा ऑडिओ क्लिपमध्ये सवांद झाला आहे.

मुंबई : शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांची सध्या एक ऑडिओ क्लिप चर्चेचा विषय बनली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये मनीषा कायंदे यांच्या स्वीय सहाय्यकाने निधीच्या मोबदल्यामध्ये 10% कमिशन मागितल्याचा ऑडिओ क्लिपमध्ये सवांद झाला आहे. यासंदर्भात बोलताना मनीषा कायंदे म्हणाल्या, “मी शिंदे गटामध्ये आल्यानंतर ठाकरे गटाने माझ्या विरोधामध्ये एक कट कारस्थान केलेलं आहे. माझ्यासोबत काम करणाऱ्या त्या व्यक्तीला निलंबित केले आहे. अशा कुठल्याही पद्धतीचे समर्थन मी करणार नाही आणि केलेलं नाही.” या ऑडिओ क्लिपमध्ये गोंदिया जिल्ह्याचे जिल्हा उपप्रमुख तेजराम मुरगडे यांनी एका कामासंबंधी मनीषा कायंदे यांना निवेदन दिलं होतं. त्याचा पाठपुरावा त्यांनी सुरू ठेवला होता. 14 जूनला तेजराम मोटघरे यांनी मनीषा कायंदे यांना फोन केला. तेव्हा…, नेमकं या ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे, हे सविस्तर जाणून घेण्यासाठी यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट पाहा…

 

Published on: Jun 26, 2023 08:33 AM
राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्षपदाचा गोंधळ? फडणवीस यांचा निशाना; म्हणतात ‘ओबीसी चेहरे केवळ’
Special Report : भगीरथ भालके राष्ट्रवादीवर का नाराज? बीआरएसचा मविआला किती फटका बसरणार?