“गॉसिप करणाऱ्या सुषमा अंधारे तुम्हाला चालतात का?”, मनीषा कायंदे लिहिणार रश्मी ठाकरे यांना पत्र
शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आमदार मनीषा कायंदे आणि उबाठाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा वाद अधिक रंगत चालला आहे. सुषमा अंधारे यांनी राहुल शेवाळे यांच्या पत्राचा आधर घेत मनीषा कायंदे यांच्यावर टीका केली आहे. आता याच पार्श्वभूमीवर मनीषा कायंजे रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार आहेत.
मुंबई : शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आमदार मनीषा कायंदे आणि उबाठाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा वाद अधिक रंगत चालला आहे. सुषमा अंधारे यांनी राहुल शेवाळे यांच्या पत्राचा आधर घेत मनीषा कायंदे यांच्यावर टीका केली आहे. आता याच पार्श्वभूमीवर मनीषा कायंजे रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार आहेत. मनीषा कायंदे म्हणाल्या की, “सुषमा अंधारे या वाचाळवीर आहेत. महाप्रबोधन यात्रेचा मी ही भाग होते, परंतु ज्या पद्धतीचे त्यांचे वागणे होते, पक्षातल्या इतर नेत्यांबद्दल वाईट बोलणं होतं यामुळे अनेक तक्रारी येत होत्या. सुषमा अंधारे यांच्यामुळे उबाठाच्या महिला आघाडीत अस्वस्थता आहे.मी रश्मी ठाकरे यांना एक पत्र लिहीणार आहे, त्यात मी हा जाब विचारणार आहे की गॉसिप करणाऱ्या सुषमा अंधारे तुम्हाला चालतात का ? आदित्य ठाकरे यांच्यावर जेव्हा आरोप होत होते, तेव्हा मी आवाज उठवला. आता या सुषमा अंधारे माझ्यावर आरोप करत आहेत, ते तुम्हाला पटतं आहे का?, अशा आशयाचे एक पत्र एक ओपन लेटर मी रश्मी ताईंना लिहिणारे आणि याबाबतचा जाब विचारणार आहे.”