प्राणी पक्षांवर प्रेम करणारी मनिषा…

| Updated on: Jul 23, 2022 | 5:44 PM

मला प्राणी आणि पक्षी प्रचंड आवडतात त्यापेक्षा ज्यावेळी मी पक्षांना खाऊ घालते त्यावेळी ते पक्षी आपल्या पिल्लांना खाऊ घेऊन जातात ते पाहताना मला आनंद वाटतो. तिचे हे प्राणीप्रेम बघूनच आता मुंबईत तिच्या नावाची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

दादरच्या फुटपाथवर राहणारी आणि मोबाईलचे कव्हर विकून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या मनिषाचं नाव सध्या सगळ्यांच्या तोंडी आहे. मोबाईलसाठी पावसाळ्यात पावरल्या जाणाऱ्या कव्हर मनिषा फिरुन विकते. त्यातून बक्कळ कमाई होते असंही नाही, मात्र तिला प्राणी आणि पक्षांची प्रचंड आवड आहे. म्हणून ती ज्या प्रकारे मोबाईल विकून कुटुंबाली हातभार तर लावतेच मात्र कुटुंबासोबत प्राणी आणि पक्षांसाठीही ती खाऊ घालते. तिला त्याबद्दल विचारले असता ती सांगते की, मला प्राणी आणि पक्षी प्रचंड आवडतात त्यापेक्षा ज्यावेळी मी पक्षांना खाऊ घालते त्यावेळी ते पक्षी आपल्या पिल्लांना खाऊ घेऊन जातात ते पाहताना मला आनंद वाटतो. तिचे हे प्राणीप्रेम बघूनच आता मुंबईत तिच्या नावाची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

Published on: Jul 23, 2022 05:43 PM
…आताच का तुम्हाला हिंदुत्व आठवलं
Anil Bonde on Fadnavis | ‘उप’ ही लवकरच निघून जाईल, फडणवीसच होणार मुख्यमंत्री? काय आहेत डॉ. बोंडे यांचे संकेत?