जयंत पाटील तुम्हाला तुमच्याच पक्षात किती किंमत आहे, जरा विचार करा; शिवसेना नेत्याचं टीकास्त्र

| Updated on: Apr 30, 2023 | 2:28 PM

Suhas Kande On Jayant Patil : जयंत पाटील, राष्ट्रवादी अन् ठाकरेगट; शिवसेना नेत्याचा महाविकास आघाडीवर निशाणा

मनमाड : शिवसेनेचे नेते सुहास कांदे यांनी जयंत पाटील, राष्ट्रवादी आणि ठाकरेगटावर टीका केली आहे. जयंत पाटील यांना त्यांच्याच पक्षात किती किंमत आहे. त्याविषयी त्यांनीच विचार करावा. मी त्यांच्यावर काय बोलणार?, असं सुहास कांदे म्हणालेत. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचा कार्यकर्ता आहे. संजय राऊतांविषयी मी काय बोलणार. मी माझ्या मतदार संघात लक्ष घालणारा माणूस आहे, असंही कांदे म्हणालेत. मनमाडच्या बाजार समितीच्या हाय व्होल्टेज मतदान प्रक्रियेवर सुहास कांदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी लोकशाही मार्गाने चालणारा आणि लोकशाहीला मानणारा आहे. त्याच पद्धतीने मी काम करतोय. माविआचे पाच माजी आमदार माझ्याविरोधात उभे आहेत. मी माझे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहे, असं कांदे म्हणालेत.

पुणे-बारामतीचं काय? कोणत्या मागणीनं राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये कलह
राष्ट्रवादीत नेत्यांचे दोन गट; ‘या’ दोन नेत्याचं नाव घेत बच्चू कडू यांचा राष्ट्रवादीवर निशाणा