इथून पुढे महापुरुषासंदर्भात असा प्रकार झाला…काय म्हणाले मनोज जरांगे
मनोज जरांगे पाटील यांनी मालवण दौऱ्याला सुरुवात केली आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या संदर्भात महत्वाचे वक्तव्य केले आहे. त्यांनी या संदर्भात राज्य सरकारकडे मोठी मागणी केली आहे.
मराठा आरक्षण आंदोलक नेते मालवण दौऱ्यावर निघाले आहेत. त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या संदर्भात प्रथमच आपले मत मांडले..ते म्हणाले मला यात राजकारण करायचे नव्हते म्हणून मी काही प्रतिक्रीया दिलेली नव्हती. परंतू आपण राजकोट किल्ल्याची पाहणी करणार आहोत. आपण उद्या मालवण आणि पुण्याच्या दौऱ्यावर निघणार आहोत.इथून पुढे तर राष्ट्रपुरुषांच्या बाबत अशी घटना घडली तर त्याला जामीनच मिळू नये अशी कायद्यात सुधारणा करण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. उद्या मालवण आज मुक्काम असणार आहे आणि एक तारखेला राजकोट येथील शिवरायांच्या किल्ल्याला आपण भेट देणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.एक तारखेला पुण्यात मुक्काम असणार आहे. दोन तारखेला भीमाशंकर येथे दर्शन करून पुण्यामध्ये मराठा बांधवांची बैठक घेणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तीन तारखेला शिवाजीनगर येथील न्यायालयात तारखेसाठी हजर राहणार आहोत असा कार्यक्रम जरांगे यांनी सांगितला आहे.