गुणरत्न सदावर्ते कुणाचे पिल्लू, काय बोलावे? कुणी उडविली खिल्ली
मनोज जरांगे पाटील यांना अटक करा अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केलीय. या मागणीची खिल्ली उडवलीय. सदावर्ते कुणाचे पिल्लू आहे हे आम्हाला माहित आहे. ते त्यांच्या मालकाचेच ऐकतात. महाराष्ट्र बिघडवू नका.
जालना : 13 ऑक्टोबर 2023 | मनोज जरांगे पाटील यांच्या संवाद यात्रेची सांगता उद्या १४ ऑक्टोबरला जालन्यातील अंतरवाली सराटी गावात होणार आहे. उद्याची ही सभा हिंसक होईल. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना अटक करा अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केलीय. गुणरत्न सदावर्ते यांच्या या मागणीची जरांगे पाटील यांनी खिल्ली उडवलीय. काय माणसाचा प्रश्न आणला बुवा तुम्ही? काय बोलावे असा टोला त्यांनी लगावला. ज्या माणसाला सामान्यांचे प्रश्न समजत नाहीत त्याबद्दल काय बोलावे? सदावर्ते जनरल सॉलिसिटर पाहिजे होते, सुप्रीम कोर्टातील आरक्षण आणि आमची मागणी वेगळी आहे. त्यांचा इतिहास महाराष्ट्राला माहिती आहे. सदावर्ते कुणाचे पिल्लू आहे हे आम्हाला माहित आहे. ते त्यांच्या मालकाचेच ऐकतात. त्यांच्या मालकाने सांगितलं की काय? अशी टीका पाटील यांनी केली. त्यांचा मालक पण म्हणाला होता की आम्ही पोलिसांवर हल्ला केला. त्यांच्या मालकाने गुणरत्न सदावर्ते यांना समज द्यावी. महाराष्ट्र बिघडवू नका. आमची सभा शांततेत होणार. पायाखाली मुंगी सुद्धा मारणार नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.