‘काही आमदार थेट मराठ्यांत फूट पाडाताहेत,त्यांचे येत्या निवडणूकीत…,’ जरांगे यांचा कोणाला इशारा

| Updated on: Sep 11, 2024 | 5:36 PM

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 16 सप्टेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यांनी आपले काम धंदे सोडून आंतरवाली सराटीत येऊ नये असे आव्हान समाजाला केले आहे.

Follow us on

माझ्या समाजासाठी लढायला पुन्हा मी तयार आहे. मध्यंतरी उपोषण स्थगित केले होते. 16 सप्टेंबरच्या रात्री पासून मी उपोषणाला बसतोय असे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. समाजाच्या लेकरांना न्याय मिळण्यासाठी तुम्ही आरक्षण द्या आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू. पण तु्म्ही आरक्षण नका देऊ मग मराठ्यांची मस्ती आणि माज काय आहे हे तुम्हाला कळेल असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. तुम्ही आरक्षण मिळायच्या आधी EWS मधून मुलांनी फॉर्म भराला होता. त्याच वेळी सांगायचे ना तु्म्ही ईडब्ल्यूएस घेऊ नका, देवेंद्र फडणवीस का आमच्या मराठ्यांच्या पोरांचं नुकसान करायला लागले आहेत, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. दरेकर साहेब विरोधात बोलले आहेत. ते ठीक आहे पण काही आमदार थेट मराठ्यांत फूट पाडायला लागले आहेत. त्या आमदाराचं येत्या इलेक्शनला काय होते ते आता पहाच असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.