सगेसोयरे कायद्याबाबत सतत सावध रहा, काय म्हणाले मनोज जरांगे
मनोज जरांगे पाटील यांच्या चलो मुंबईचा नाऱ्याने सरकारने अखेर नमते घेतले आहे. जरांगे यांच्या प्रमुख मागणी नूसार सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा अध्यादेश सरकारने काढला आहे. या राजपत्राचे लवकरच कायद्यात रुपांतर होणार आहे. त्यानंतर शपथपत्र सादर केल्यानंतर सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. राजपत्राविरोधात विरोधक हरकती सादर करणार आहेत. तर आपणही आपल्या पॉझिटीव्ही प्रतिक्रीया सादर करुयात असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
जालना | 28 जानेवारी 2024 : सगेसोयऱ्यांना आरक्षण देण्याबाबतीचा अध्यादेश निघाल्यानंतर मराठा नेते मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत आले आहेत. या यशानंतर आपण गाफील राहता कामा नये या सेगसोयरे कायद्याचा फायदा समाजाला झाला पाहीजे त्यामुळे सतत सावधान राहीले पाहीजे असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर होणार आहे. या राजपत्रावर विरोधक हरकती घेणार आहेत. जितका ते विरोध करतील तितका हा कायदा आपल्यासाठी फायद्याचा आहे हे समजायला हवे. आपणही आपली पॉझिटीव्ह बाजू मांडा. ज्यांना कायद्याच्या बाजूने लेखी प्रतिक्रिया पाटवता येणार नाहीत. त्यांनी सोशल मिडीयावर कायद्याच्या बाजूने मत मांडत सरकारवर दबाव निर्माण करावा असेही आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. हा राजपत्रित आदेश आहे. त्याचे कायद्यात रुपांतर होणार आहे. तोपर्यंत आपल्याला सावध रहायला हवे असेही त्यांनी म्हटले आहे. जोपर्यंत समाजाला या कायद्याचा फायदा होत नाही तोपर्यंत आपण जागरुक रहायला हवे असेही त्यांनी यावेळी केलेल्या भाषणात म्हटले आहे.