Manoj Jarange Patil | उद्यापर्यंत निरोप न आल्यास; मनोज जरांगे पाटील यांनी दिला हा इशारा
गेल्या ११ दिवसांपासून उपोषण करत आहे. राज्य सरकारला चार दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. परंतु, अद्याप सरकारनं कोणताही निर्णय घेतला नाही. उद्यापासून पाणीसुद्धा घेणार नाही, असा इशारा मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला.
जालना, ८ सप्टेंबर २०२३ : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. त्यांनी सरकारचा चार दिवसांचा अल्टिमेटम (Ultimatum) दिला होता. पण, अद्याप समाधानकारक तोडगा निघाला नाही. मनोज जरांगे पाटील म्हणतात, तिकडून निरोपचं येईना. पिशवी भरून ठेवली. मंत्रालयात चर्चेला जाण्यासाठी आम्ही तयार आहोत. पण, अद्याप निरोप आला नाही. आम्ही चार पाऊलं मागे घेतले. उशीर करू नका. पटकन आरक्षण द्या, असं तीनदा म्हटलं. बैठकांचा पार्ट वेगळा आहे. चर्चेला येत नाहीत. म्हणून मी मंत्रालयात जायला तयार आहे. चार दिवसांच्या कालावधी संपल्यानंतर मी सलाईन घेणार नाही. शिवाय पाणीसुद्धा बंद करेन, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला. आमच्याही लेकरांना भाकर मिळू द्या, असं मनोज जरांगे पाटील म्हणतात. प्रकाश शेडगे यांच्या वक्तव्यानंतर जरांगे पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली. निर्णय आला नाही तर पाणी आणि सलाईन बंद करण्याच्या निर्णयावर जरांगे पाटील ठाम आहेत. त्यामुळे उद्यानंतर राज्य सरकार कोणती पाऊलं उचलते हे पाहावं लागेल.