Video | ‘आमच्या नेत्याबद्दल अर्वाच्चभाषा, तुम्ही काय एवढे मोठे…,’ काय म्हणाले गिरीश महाजन
मनोज जरांगे यांचे आरोप पाहाता ते भ्रमिष्टासारखे बोलू लागले आहेत असे वाटत असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. आतापर्यंत राज्याच्या प्रमुखाबद्दल अशी भाषा कोणी वापरलेली नाही. त्यामुळे त्याची एसआयटी चौकशीची मागणी आपण केली होती. आणि ती पूर्ण देखील झाल्याचे महाजन यांनी म्हटले आहे.
यवतमाळ | 27 फेब्रुवारी 2024 : मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत. म्हणून आम्ही त्यांच्या आंदोलनाची दखल गांभीर्याने घेतली होती. नंतर आणखी काही मंत्री देखील त्यांना भेटले. मुख्यमंत्री देखील भेटले. नंतर मोर्चा घेऊन नवीमुंबईत आल्यानंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेतली. इतका आदर आम्ही जरांगेचा केला परंतू गेल्या काही दिवसांपासून त्यांनी राजकीय टीका करायला सुरुवात केली. आमच्या नेत्यांबद्दल अशी भाषा वापरली, तुम्ही काय एवढे मोठे सुप्रिमो नाही अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगे पाटील यांच्यावर केली आहे. ते शिवसेनेचे किंवा राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्याप्रमाणे बोलत आहेत. शिवसेना कशी फोडली. राष्ट्रवादी कशी संपविण्याचा प्रयत्न केला जातोय हे सांगणं त्यांचे काम नाही. त्यांनी केवळ आरक्षणावर बोलावं असेही महाजन यावेळी म्हणाले. एका रात्री पोलिसांचा चुकीचा लाठीमार झाल्याने ते हिरो झाले. म्हणून वाटेल ती मागणी तुम्ही कराल ती पूर्ण होणार काय? असाही सवाल महाजन यांनी करीत जरांगे यांची एसआयटी चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले.