Mansukh Hiren Death Case : मृतदेह बाहेर काढणाऱ्यांकडून ऐका नेमकं काय दिसलं!
मनसुख हिरेन (Mansukh Hiren Death Case) यांचा मृतदेह सापडल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर (Mukesh Ambani Bomb Scare) सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन (Mansukh Hiren Death Case) यांचा मृतदेह सापडल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मनसुख यांचा मृतदेह चिखलात पालथ्या अवस्थेत पडलेला दिसला. त्यांच्या तोंडात सहा ते सात रुमाल कोंबले होते, अशी माहिती त्यांचा मृतदेह पहिल्यांदा पाहिलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिली. वाघमारे आणि पंडित यांच्याशी ‘टीव्ही 9 मराठी’ ने बातचित केली. (Mansukh Hiren Dead body witness Waghmare Bhagwan pandit claims handkerchiefs found inside his mouth)
Published on: Mar 06, 2021 02:10 PM