पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा… संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
मकर संक्रांतीचा सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला असून येवल्यामध्ये मोठ्या उत्साहात मकर संक्रांत साजरी केली जाते. मुंबई, पुणे, नागपूर असो किंवा कोणंतही शहर असो, पैठणी म्हटलं महिलांच्या चेहऱ्यावर हसू येतं आणि ओठांवर एकच नााव येते ते म्हणजे येवला
मकर संक्रांतीचा सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला असून येवल्यामध्ये मोठ्या उत्साहात मकर संक्रांत साजरी केली जाते. मुंबई, पुणे, नागपूर असो किंवा कोणंतही शहर असो, पैठणी म्हटलं महिलांच्या चेहऱ्यावर हसू येतं आणि ओठांवर एकच नााव येते ते म्हणजे येवला. येथील पैठणी फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात प्रसिद्ध आहेत. मकर संक्रांतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर येवल्यामध्ये सध्या अनेक दुकानांमध्ये पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड उडाली आहे.
आम्ही पैठणी विकत घेण्यासाठी खास पुण्यावरून आलो आहोत. येवल्यातील दुकानांमधील पैठणी खूप फेमस आहे, त्यांची क्वॉलिटी,सूत हे खूप चांगलं असतं. आम्ही याआधीसुद्धा येथील दुकानांमधून पैठणी घेतल्या आहेत,तो अनुभव उत्तम होता, त्यामुळे आम्ही पुन्हा इकडेच आलो आहोत, असे एका महिला ग्राहकाने सांगितलं.
Published on: Jan 11, 2025 04:47 PM