‘दोन्ही घरांची सगळीचं माणसं गेली’, काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

| Updated on: Jul 20, 2023 | 11:04 AM

तर रायगडमध्ये सुरू असणाऱ्या सततच्या पावसामुळे तेथे मोठी दुर्घटना घडली आहे. येथील खालापूरनजिक इर्शाळगडवाडी येथे दरड कोसळल्याने अख्खी वाडीच मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहे.

रायगड, 20 जुलै 2023 | गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. तर रायगडमध्ये सुरू असणाऱ्या सततच्या पावसामुळे तेथे मोठी दुर्घटना घडली आहे. येथील खालापूरनजिक इर्शाळगडवाडी येथे दरड कोसळल्याने अख्खी वाडीच मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहे. तर 5 जणांचा मृत्यू झाला असून 75 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. तर अनेक जन अजूनही त्या ढिगाऱ्याच्या खाली सापडले आहेत. यावरून सध्या आपल्या नातेवाईकांच्या शोधात अनेक लोक हे इर्शाळगडवाडी येथे पोहचत आहेत. यादरम्यान ज्यांनी आपले मुलं, मुली, मुगला, सुन, पती, पत्नी, वडिल आणि आई गमावले त्यांचा आक्रोश हा हृदय पिटाळून टाकणारा आहे. यावेळी येथे एका आजीचा आक्रोश तेथे असणाऱ्यांच्या डोळ्यांच्या कटा ओल्या करत होत्या. या आजीचं अख्ख कुटुंबच या घटनेत संपलं आहे. त्यामुळे या आजीनं माझी नातं गेली, दोन्ही घरांची सगळीचं माणसं गेली. त्यामुळे आता जगू कोणासाठी, त्याचा काय फायदा म्हणत हंबरडा फोडला. ज्यामुळे अनेकांच्या पोटातील पाणी हलत होतं. यावेळी अधिक माहितीसाठी प्रशासनाकडून 8108195554 हा हेल्पलाईन नंबर देण्यात आला आहे.

Published on: Jul 20, 2023 11:04 AM
मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
रेल्वेतून उतरले…6 महिन्याचं बाळ हातून निसटलं, आजोबांनी सांगितला घटनाक्रम