तुमची लोकं तुम्ही थांबवा, डाव टाकायला लावू नका, जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा
'आम्हाला 10 टक्के आरक्षण नको आहे तरी सरकार बळे बळेच आरक्षण देत आहे. त्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. सरकारने त्यांची लोकांना थांबवावे अन्यथा आम्हालाही डाव टाकायला लागेल असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. उद्या आपण आपली पुढील भूमिका जाहीर करणार असून जर आमच्या पोरांवर गुन्हे दाखल केले तर आम्ही देखील सगळ्यांची नावे जाहीर करु असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.
जालना | 24 फेब्रुवारी 2024 : मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण जाहीर केल्यानंतर एकीकडे राज्य सरकार स्वत:ची पाठ थोपटवून घेत आहे. दुसरीकडे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या 10 टक्के आरक्षणाला आम्ही मागणी केली नसताना बळेबळेच आम्हाला का 10 टक्के आरक्षण का दिले जात आहे असे म्हटले आहे. आम्हाला ओबीसीतून आरक्षण मिळावे आणि सगे-सोयरे नोटीफिकेशनची अंमलबजावणी तातडीने करावी अशीही मागणी जरांगे यांनी करत आंदोलन सुरुच ठेवले आहे. जरांगे यांचे एकेकाळचे सहकारी अजय महाराज बारसकर यांनी मनोज जरांगेंवर प्रचंड टीका केली आहे. त्यानंतर संगिता वानखेडे यांनी देखील जरांगे शरद पवारांचा माणूस असल्याची टीका केली. त्यानंतर जरांगे यांनी मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांना माणूस याचा बोलविता धनी असल्याची टीका केली आहे. जरांगे यांनी आज ( शनिवारी 24 फेब्रुवारी ) सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत रास्ता रोको करण्याचे आवाहन मराठा जनतेला केले आहे. त्यानुसार राज्यात ठिकाणी रास्ता रोको सुरु आहे. तुमची लोकं तुम्ही थांबवा, मला डाव टाकायला लावू नका असा इशारा सरकारला दिला आहे. शांततेत रास्ता रोको करणाऱ्यांवरही काही ठिकाणी गुन्हे दाखल केले जात आहे. त्यावरही जरांगे यांनी प्रचंड टीका केली आहे.