‘या’ जिल्ह्यातील फोटोग्राफरांच्या रोजीरोटीचं काय? थेट समाजानाच म्हटलं आता बस्स… काय आहे प्रकरण?
आता अनेक जन प्री-वेडिंग फोटोशूटकडे वळत आहेत. ज्यात लग्नापूर्वी काही फोटो काढले जातात. मात्र आता या नवीन स्टाईललाच ब्रेक लागला आहे. सोलापूरात वेडींग शूटिंगवर मराठा समाजाने बंदी घातली आहे.
सोलापूर : लग्न म्हटलं कि अनेक गोष्टी आल्या मग घरात पहिलं किंवा सेवटचं लग्न असेल तर मग होऊ दे खर्च असचं चित्र सगळीकडं पहायला मिळत. त्यात आता अनेक जन प्री-वेडिंग फोटोशूटकडे वळत आहेत. ज्यात लग्नापूर्वी काही फोटो काढले जातात. मात्र आता या नवीन स्टाईललाच ब्रेक लागला आहे. सोलापूरात वेडींग शूटिंगवर मराठा समाजाने बंदी घातली आहे. मराठा सेवा संघ आयोजित सोलापुरातील मराठा वधू-वर परिचय मेळावा घेतला. मेळाव्याला जवळपास 500 वधू – वरांना हजेरी लावली होती. त्यात हा ठराव करण्यात आला. जो एक मताने मंजूर करण्यात आला आहे. तर प्री – वेडींग शूटिंगवरील अतिरिक्त खर्च तळून समाजपयोगी कार्यासाठी पैसा खर्च करण्याचा आग्रह समाजानं धरला आहे. याबाबत मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. हा एकप्रकारे चांगला निर्णय असला तरिही जिल्ह्यातील अनेक फोटोग्राफरांच्या रोजीरोटीवर परिणाम करणारा आहे. कारण सध्या प्री-वेडिंग फोटोशूटला चांगली मागणी असतानाच असा निर्णय झाल्याने तो थेट या उद्योगात काम करणाऱ्याच्या मुळावर उठणारा आहे.