शांततेत खूप मोर्चे काढले, पण आता बस्स… थेट मंत्रालयावर जाणार; मराठा क्रांती मोर्चा पुन्हा आक्रमक
Maratha Kranti Morcha : मराठा आरक्षणाबाबत राज्यसरकारला जाब विचारण्यासाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला आहे. मराठा क्रांती मोर्चा पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला आहे. पाहा...
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मराठा क्रांती मोर्चा पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच, पाहिजे या आग्रही मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा पुन्हा रस्त्यावर उतरला आहे. मराठा क्रांती मोर्चा आज मुंबईत धडकणार आहे. “आतापर्यंत आम्ही शांततेत खूप मोर्चे काढले, पण आता बस्स झालं. आता मर्यादा ओलंडल्या गेल्या आहेत. आम्ही आता थेट मंत्रालयावर मोर्चा काढणार आहोत. सरकारला जाब विचारणार आहोत”, असं मत मराठा आंदोलकांनी व्यक्त केलं.
Published on: Mar 01, 2023 07:59 AM