मराठ्यांच्या आरक्षणाविरोधात जो बोलेल त्याला सोडणार नाही, जरांगे पाटील यांनी सुनावले
मराठा आंदोलनाचे नेते येत्या 20 जानेवारीला मुंबईत धडकणार आहेत. त्यावरुन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांच्यावर टीका केली होती. काही लोकांना मुंबईला जाण्याची घाई लागली आहे असे अजितदादा म्हणाले होते. त्यावरुन मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती. त्याबद्दल पत्रकारांनी विचारले असताना जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्यावर एकेरी शब्दात हल्ला केला आहे.
जालना | 14 जानेवारी 2024 : अजितदादा पवारांनी मराठा आंदोलनाचे मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती. त्याला जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले होते. यावर छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांना कुठून मस्ती आलीय अशी टीकी केलेली होती. यावर जरांगे पाटील यांनी भुजबळांवर पुन्हा एकेरी भाषेत उल्लेख करीत सडकून टीका केली आहे. तु कोण मस्ती शिकविणारा आमची आम्ही बघून घेऊन. याआधी आपण कधीच अजित पवारांवर टीका केली नाही. परंतू जर मराठ्यांच्या आरक्षणा विरोधी टीका मराठ्यांनी जरी टीका केली त्यांना सोडणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मिडीयाशी बोलताना केली आहे. पाच महिने आम्ही अजितदादांवर टीका केली का ? ते गप्प बसले की आम्हीही गप्प बसणार पण मराठ्यांच्या आरक्षणावर टीका केली त्याला आपण सोडणार नाही असेही ते म्हणाले. छगन भुजबळ यांना स्वत:चं स्वत:ला आवरत नाही. त्यांनी दुसऱ्याला शिकवू नये. त्यांनी ओबीसी आणि धनगरांना आमच्या विरोधात भडकावू नये. ते कलंकित असल्याने त्यांनी आता शेरो शायरीच करीत राहावे त्यांना 101 रुपयांच्या सुपारी कोणीही देतील असाही सल्ला मनोज जरांगे यांनी भुजबळांना दिला.