Kolhapur Maratha Protest LIVE | कोल्हापुरात संभाजीराजेंच्या नेतृत्वात आज मूक आंदोलन
खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्त्वात आज कोल्हापुरात मराठा मूक मोर्चाला सुरुवात होत आहे. त्यानंतर राज्यात विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात येणार आहेत. | Maratha Morcha
सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण नाकारल्यानंतर, आता मराठा समाज आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक झाला आहे. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्त्वात आज कोल्हापुरात मराठा मूक मोर्चाला सुरुवात होत आहे. त्यानंतर राज्यात विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात येणार आहेत. आजच्या मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर आणि मराठा नेते विनोद पाटील हेदेखील सहभागी होणार आहेत. मात्र, या मोर्चावर पावसाचे सावट आहे.