राऊतांचे हॉटेल जळणार हे भुजबळांना कसं माहित? आता कुणी केला हल्लाबोल?

| Updated on: Nov 18, 2023 | 7:16 PM

भुजबळ यांनी मराठा समाजाच्या बदनामीचा कट रचला आहे. त्यांची नार्को टेस्ट करा आणि गुन्हे दाखल करा. तो रिपोर्ट महाराष्ट्रासमोर जाहीर करा. अशी मागणी मुख्य्म्नात्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून करणार आहे असे योगेश केदार म्हणाले.

पुणे | 18 नोव्हेंबर 2023 : मराठा समाजाच्या आंदोलकांनी बीड येथे जाळपोळ आणि आमदार यांच्या घरावर हल्ले केले असा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी बीड येथील पाहणी दोऱ्यादरम्यान केला होता. त्यावेळी भुजबळ यांनी आपण मंत्रालयात बसलो होतो. माझ्यासमोर हॉटेल मालक सुरेश राऊत बसले होते. आंदोलकांची जाळपोळ पाहून त्याचे हॉटेल जळणार याची सूचना पोलिसांना दिली. मात्र, पोलीस हतबल होते असे विधान केले होते. भुजबळ यांच्या याचा विधानावरून आता मराठा समाजाचे समन्वयक योगेश केदार यांनी हल्लाबोल केलाय. छगन भुजबळांची पोलीस महासंचालकाकडे तक्रार केली जाणार आहे. छगन भुजबळांची पोलीस चौकशी करा अशी मागणी त्यांनी केलीय. भुजबळ यांच्या कॅबिनमध्ये बसलेल्या राऊतांच हॉटेल जळणार हे त्यांना कसं माहिती होत? कसं काय कळलं तुम्हाला? केवळ मराठा समाजाला बदनाम करण्याचा बनाव रचला आहे का? असे सवाल करत बीडची जाळपोळ ही छगन भुजबळांनी करायला लावली असा आरोपही केदार यांनी केला.

Published on: Nov 18, 2023 07:16 PM
नवी मुंबई मेट्रो सेवा सुरु, पाहा काय आहेत नवीमुंबईकरांच्या प्रतिक्रिया
एकनाथ शिंदे रॉकेट, फडणवीस सुतळी बॉम्ब, ठाकरे राऊत कोण, कुणी फोडले राजकीय फटाके?