गुढीपाडवा शोभयात्रेत राम मंदिराचा चित्ररथ
सकल हिंदू समाज आयोजित शोभायात्रेला कर्वेनगर, आंबेडकर चौकापासून शोभयात्रेला सुरुवात झाली. यावेळी पारंपरिक वेशभूषा करून महिला, तरुण लहान मुलं शोभायात्रेत सहभागी झाले
पुणे : साडे तीन शुभ मुहूर्त पैकी आजचा एक मुहूर्त आणि मराठी नवीन वर्षाचा दिवस असल्याने राज्यात सध्या गुढीपाडव्याचा उत्साह पहायला मिळत आहे. मुंबईसह नागपुरमध्ये शोभायात्रा काढल्या जात आहेत. अशीच शोभा यात्रा पुण्यात सकल हिंदू समाजतर्फे आयोजित करण्यात आली.
सकल हिंदू समाज आयोजित शोभायात्रेला कर्वेनगर, आंबेडकर चौकापासून शोभयात्रेला सुरुवात झाली. यावेळी पारंपरिक वेशभूषा करून महिला, तरुण लहान मुलं शोभायात्रेत सहभागी झाले. तर शोभायात्रेत आयोध्यातील भव्य राममंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे. मर्दानी खेळ, फुगड्या खेळत मोठ्या जल्लोषात शोभायात्रा काढण्यात आली.